अहमदनगर बातम्या

अहमदनगर जिल्ह्यातील खळबळजनक घटना ! मुंडकं कापलेलं धड विहिरीत सापडल….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका ४५ वर्षीय व्यक्तीचे मुंडके नसलेले धड विहिरीत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास लक्षात आली आहे. तालुक्यातील पिंपळगाव निपाणीच्या धांबोडी फाटा येथील भाऊसाहेब दाजीबा तोरमल यांचा मृतदेह अश्या अवस्थेत सापडला आहे.

ही नायलॉन दोरीने केलेली आत्महत्या आहे की, घातपात.! याबाबत पोलिसांमध्ये साशंकता होती. त्यामुळे, धड आणि मुंडकं पोष्टमार्टमसाठी सरकारी रुग्णालयात आणल्यानंतर आता वैद्यकीय अहवालात याबाबत असणारे तर्क वितर्क व अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळणार आहे.

दुपारी ३ वाजता मयत व्यक्तीचे धड बाहेर काढण्यात पोलिस व नागरिकांना यश आले. मात्र, विहिर खोल असल्याने मुंडके तळाला गेल्याने ते अद्याप मिळून आले नव्हते.

गोताखोराच्या माध्यमातून ते शोधण्याचे काम सुरु होते. या घटनेबाबत तुर्तास अकोले पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे धांबोडी फाटा परिसरात भाऊसाहेब तोरमल हे गृहस्त राहत होते. व्यसनाधिनतेमुळे त्यांच्यात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली होती. त्यामुळे, त्यांनी आत्महत्येचे प्रयत्न केल्याची चर्चा सुरु होती.

संपुर्ण तालुक्यात या घटनेची चर्चा सुरु होती. कारण, धड वेगळे आणि मुंडके वेगळे असे ऐकल्यानंतर खरोखर ही आत्महत्या आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे, याबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

आत्महत्या करताना दोरी कशी तुटली नाही? मुंडके पाण्यात आहे का? काहीही झाले तरी खरच मुंडके तुटून पडेल अशी परिस्थिती निर्माण होईल का? तुटलेच मुंडके तर ते अद्याप कसे सापडले नाही.

अशा प्रकारे कोणी नियोजनबद्ध प्लॉन करु शकतो का ? हा प्रकार व्यसनातून झाला असावा का ? त्यांची कोणासोबत दुष्मणी होती का?

त्यांनी आत्महत्या करण्याचे इतके प्रबळ कारण काय असावे? त्यांच्यावर कर्ज होते का? सावकारी प्रेशर होते का? अशी अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24