सात एकर ऊस जळून झाला भस्मसात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- अकोले तालुक्यात शनिवारी दुपारी आगीत जवळपास सात एकर जळून भस्मसात झाला आहे. दरम्यान पाच शेतकऱ्यांचा मिळून सात एकर ऊस जळून खाक झाला आहे.

यामुळे बळीराजा आर्थिक अडचणीत सापडला आहे. या दुर्घटनेत सुरेश बबन दातीर, अंबादास मारुती दातीर, मनोहर महादू काळे, संदीप निवृत्ती दातीर यांच्या मालकीचा ऊस भस्मसात झाला आहे.

उसाच्या शेताच्या शेजारी महावितरण कंपनीची मेन लाईनचा इलेक्ट्रिक पोलचा जंप जळून तुटल्याने आग लागून सात एकर उसाचे नुकसान झाले आहे.

ही आग आटोक्यात आणण्यासाठी अगस्ती सहकारी साखर कारखाना व संगमनेर साखर कारखाना यांच्या अग्निशमक दलांच्या जवानांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.

अनेक इलेक्ट्रिक पोलवरील जम्प व वायर हे खराब झाल्याने अशा घटना घडत आहे. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी महावितरनाणे तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

तसेच या परिसरातील नागरिकांनी लवकरात लवकर महावितरणने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24