नागरिकांच्या घरात शिरले गटारीचे पाणी; संतप्त महिलांनी पालिका कार्यालयात जात केले असे काही.. !

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे या काळात मोठ्या प्रमाणात साथीचे आजार पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे असे आजार पसरू नयेत यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून स्वच्छता मोहीम राबवली जाते. मात्र अशी मोहीम तर दूरच पण पाथर्डी नगरपालिका हद्दीत असलेल्या साईनाथ नगर विभागात नागरी सुविधा मिळत नसल्याचा आरोप करत, या विभागात राहणाऱ्या महिलांनी पालिका कार्यालयात धरणे आंदोलन केले.

सुशिक्षित व नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात राहत असलेल्या साईनाथ नगर विभागात वेळेवर पाणीपुरवठा केला जात नाही. तसेच जे पाणी येते ते सुद्धा दूषित येते. या विभागात असलेल्या गटारीमधील गाळ काढला जात नसल्याने नागरिकांच्या घरात गटारीचे पाणी जाते. घंटागाडी वेळेवर येत नसल्याने कचरा कुठे फेकावा असा प्रश्न आहे.

या विभागात असलेल्या बागेमधील विजेचे दिवे बंद असल्याने या ठिकाणी सायंकाळी जाता येत नाही, अशी तक्रार विभागातील महिलांनी करत थेट पालिकेच्या कार्यालयात धरणे आंदोलन सुरू केले.

यावेळी आंदोलक महिलांनी घरपट्टी व पाणीपट्टी नियमित भरतो. नागरी ठेवले पालिका अडचणी दखल मात्र, जाणीवपूर्वक सुविधांपासून वंचित जाते. अनेकवेळा कार्यलयात येऊन सांगितल्या. मात्र, घ्यायला पालिका प्रशासनाला वेळ नाही. आमच्या भागात नालेसफाई केली जात नसल्याने गटारीचे पाणी घरात येऊन घरात दुर्गंधी पसरली आहे.

वेळेवर पाणी पुरवठा केला जात नाही व जो केला जातो तो सुद्धा दूषित असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. घंटागाडी दररोज येणे अपेक्षित असतानांही अचानक कधीही घंटागाडी येते. परिसरात पालिकेने बगीचा उभारला असला तरीही याठिकाणी वीज नसल्याने सायंकाळी उशिरापर्यंत बागेत बसता येत नाही.

आमच्या मागण्यांची दखल घ्यायला पालिकेला वेळ नसून तातडीने सुधारणा केल्याशिवाय उठणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर या आंदोलनाला पालिकेतील प्रशासकीय अधिकारी अमोल मदने व अशोक डोमकावळे सामोरे गेले. त्यांनी तातडीने या परिसरात येऊन पाहणी करून समस्या सोडवू, असे आश्वासन दिल्यानंतर महिलांनी आंदोलन विसर्जित केले.

Ahmednagarlive24 Office