अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :-नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिनदर्शिकेचे प्रकाशन करून शब्दगंध प्रकाशनाने नवीन वर्षाची चांगली सुरुवात केली आहे. ही दिनदर्शिका साहित्यिकांना मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन ॲड. कॉ. सुभाष लांडे पाटील यांनी केले.
शब्दगंध साहित्यिक परिषद व शब्दगंध प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील कोहिनुर मंगल कार्यालायात आयोजित करण्यात आलेल्या दिनदर्शिका प्रकाशन समारंभात ते बोलत होते. शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे, साहित्यिक डॉ. संजय कळमकर, प्रा. सीताराम काकडे, डॉ. महेश वीर, डॉ. जे.टी. शेंडगे, पत्रकार संदिप रोडे,
ॲड. भूषण बर्हाटे, माजी नगरसेवक श्रीनिवास बोज्जा आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. संजय कळमकर म्हणाले की, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शब्दगंध परिवाराने शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या वाढदिवसानिमित्त २ सार्वजनिक वाचनालयाला पुस्तके भेट देऊन नवा पायंडा पाडला.
वाचनालये जगवणे व तेथील वाचकांना चांगली पुस्तके उपलब्ध करून देणे. अवघड होऊन बसले आहे अशा काळात शब्दगंध ने राबविलेला हा उपक्रम प्रेरणादानी ठरणार आहे. प्रा. सिताराम काकडे म्हणाले की, राजेंद्र उदागे हा माणसांवर प्रेम करणारा माणूस आहे त्यांच्यामध्ये मोठा दातृत्व गुण आहे.
संदिप रोडे म्हणाले की, कुठलाही गाजा वाजा न करता, मुक्त हाताने अन्नदान करणारा अवलिया म्हणजे राजेंद्र उदागे आहे. भुकेलेल्यांना अन्न देणे आणि गरीब श्रीमंत असा कुठलाही भेदभाव न करता प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा व निखळ मैत्री जपणारा माणूस म्हणजे राजेंद्र उदागे.
श्रीनिवास बोज्जा म्हणाले, राजेंद्र उदागे यांचे मन त्यांच्या नावाप्रमाणेच राजसारखे आहे. कोरोना महामारी व लॉक डाऊनच्या काळात उपेक्षित, वंचित घटकांना रात्रंदिवस अन्नदान करण्याचे काम त्यांनी केले. तण, मन, धनाने समाजसेवा केली. त्यांच्या हातून भविष्यकाळात देखील अशाच प्रकारचे कार्य घडो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
शब्दगंध चे संस्थापक सुनिल गोसावी म्हणाले की, कोरोना महामारी व लॉक डाऊनमुळे गेली ९ महिने आपण एकमेकांना भेटू शकत नव्हतो. आता कोरोना महामारीचे संकट काही प्रमाणात का होईना कमी झालेले आहे. त्यामुळेच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शब्दगंध चे पदाधिकारी तसेच राजेंद्र उदागे यांचे मित्र मंडळ यांना एकत्रपणे संवाद साधता यावा म्हणून शब्दगंध दिनदर्शिकेचे प्रकाशन,
शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे, शाहीर भारत गाडेकर, व शब्दगंध चे आष्टी तालुका अध्यक्ष बाळासाहेब शेंदूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वाचनालयांना मोफत पुस्तके भेट देण्याचा उपक्रम राबविण्यात आलेला आहे. यावेळी वसंत डंबाळे, स्वाती पाटील, पी. एन.डफळ, प्राचार्य जोशी, व इतर अनेक कवींनी आपल्या शुभेच्छा पर कविता सादर केल्या.
कार्यक्रमास कवी चंद्रकांत पालवे, डॉ. अनिरुद्ध पाटील, डॉ. अखिल धानोरकर, अस्लम शेख, माधव सावंत, स्वाती पाटील, मीरा करंजीकर, इंदुमती सोनवणे, बाळासाहेब देशमुख, प्रा. डॉ. अनिल गर्जे, दादा ननावरे, ओमप्रकाश देंडगे, प्रा. डॉ. वसंत जोशी, मीना गायकवाड, अर्चना झोपे, संस्कृती रासने, विनायक पवळे,
पी. एन.डफळ, प्रा. डॉ. सुधाकर कुऱ्हाडे, कवयित्री रुता ठाकूर, कवी दशरथ शिंदे, कुंडलिक ढाकणे, कॉ. नानासाहेब कदम आदी मान्यवर उपस्थित होते. शब्दगंध चे खजिनदार भगवान राऊत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सुनिल गोसावी यांनी प्रास्ताविक केले. शर्मिला गोसावी यांनी सूत्रसंचालन केले.
सुभाष सोनवणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. अशोक कानडे, डॉ.राजेंद्र फंड, इंजि. किशोर डोंगरे, डॉ. अनिल गर्जे, बबनराव गिरी, प्रा. डॉ. राधाकृष्ण जोशी, सुभाष सोनवणे, भगवान राऊत, दिशा गोसावी, ऋषिकेश राऊत, निखिल गिरी, हर्षली गिरी, अभिजित सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.