आजपासून शनीदर्शन खुले होणार; दर्शनासाठी ‘ही’ आहे नियमावली

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :- देशात खयाती असलेले व अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल शनीशिंगणापूरचे शनीमंदीर भाविकांना दर्शनासाठी आजपासून खुले होत आहे.

दर्शन खुले करण्यात आले असले तरी सर्वांसाठी दर्शन चौथर्‍याखालूनच घेऊ देण्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी विश्वस्त मंडळास दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दरम्यान करोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दीड वर्षापासून हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून मंदीर बंद असल्याने भाविकांची संख्या नसल्याने छोटे-मोठ्या व्यावसायीकांचे प्रचंड हाल होत होते.

हातावर पोट असलेल्यांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर राज्य सरकार धार्मिक स्थळे खुले करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेत मंदिरे खुली करण्यास परवानगी दिली.

घटस्थापनेच्या दिवशी पहाटेच्या आरतीनंतर शनि मंदीर सुरू होत आहे. मात्र जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार स्वयंभू शनि मूर्तीला स्पर्श नको असल्याने सर्व भाविकांना चौथर्‍या खालूनच दर्शन घेण्याची सक्ती केली आहे.

अन्य नियमांची सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी विश्वस्त मंडळास दिल्या आहेत. जरी देवस्थान सुरू झाले असले तरी करोना नियमांचे पालन काटेकोरपणे करावे लागणार आहे.भाविक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.