Shankarrao Gadakh : शिवसेनेतील काही आमदारांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली होती मात्र अद्याप उद्धव ठाकरे यांच्यासोबत 15 आमदार असून उर्वरित आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.
मविआ मध्ये मंत्री राहिलेले क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या तिकिटावर नेवासा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले शंकरराव गडाख कालांतराने त्यांनी शिवसेनेचे भगवे बंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला होता महाराष्ट्राचे मृद व जलसंधारण या विभागाचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता.
मधल्या घडामोडींमध्ये मात्र शंकरराव गडाख हे शांत होते त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचं सांगून कोणतीही राजकीय टिप्पणी केली नव्हती त्यांना आता आपल्या कार्यकर्त्यांची संवाद साधायचा असून त्यासाठी त्यांच्या फेसबुक आणि ट्विटर वर एक पोस्ट वायरल केली आहे त्यामध्ये त्यांनी लिहलंय
मला आपल्याशी बोलायचंय..!
नमस्कार,
गेल्या काही दिवसांपासुन घडलेल्या घटना,
त्यातुन झालेले आरोप-प्रत्यारोप,
सध्या निर्माण झालेल्या राजकीय घडामोडीवर
मला आपणा सर्वांशी संवाद साधायचा आहे.
सोमवार दि. ११ जुलै २०२२ रोजी
सकाळी ९.३० वा.
मुळा पब्लिक स्कुल, सोनई येथे..
आवर्जुन उपस्थित रहावे ही विनंती.
अशी पोस्ट सध्या शंकररराव गडाख यांच्या फेसबुक पोस्ट ट्विटरवर व्हायरल होत असून शंकरराव गडाख आता नेमकी काय भूमिका मांडतात याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.