अहमदनगर बातम्या

अहमदनगर जिल्ह्यातील अजित पवारांच्या बॅनरवर शरद पवार आणि सुप्रिया सुळे !

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर मतदार संघाच्या दौऱ्यावर होते. माता मोहटादेवी महिला देवदर्शन यात्रेचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते त्या ठिकाणी झाले.

दरम्यान अजित दादांच्या कार्यक्रमस्थळी जो बॅनर लावण्यात आला याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगलीय. बॅनरवर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचा एकत्र फोटो आहे. त्यामुळे आता राजकीय नेत्यांसह जनता देखील बुचकळ्यात पडलीये.

सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्षांवर ताशेरे

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता दिरंगाई प्रकरणावर जे काही चालवले आहे त्यावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. अध्यक्षांचे वेळापत्रक आम्हाला अजिबात मान्य नाही, असे सांगत सरन्यायाधीश यांनी विधानसभा अध्यक्ष आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे, असे सरन्यायाधीश म्हणाले. राहुल नार्वेकर यांना मंगळवारी नवीन वेळापत्रक सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

अध्यक्षांकडून वेळापत्रक येणार नसेल तर सर्वोच्च न्यायालयाला विशिष्ट टाईमलाईन ठरवावी लागणार आहे. दोन महिन्यांची ही टाईमलाईन असू शकते, जी सभापतींना बंधनकारक असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.

अध्यक्षांना निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ११ मे रोजी या प्रकरणी निकाल देऊन त्यांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचे सर्व अधिकार अध्यक्षांकडे सोपवून पाच महिने उलटून गेले आहेत. पाच महिने उलटूनही अपात्रतेची सुनावणी वेगाने का होत नाही? याबाबत ताशेरे ओढत सर्वोच्च न्यायालयाने सुनावलं आहे.

राष्ट्रवादी व शिवसेनेच्या आमदारांना अपात्र ठरवण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना द्यावेत अशी याचिका आहे आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी शुक्रवारी पार पडलेली होती.

याच सुनावणीत हे कडक शब्दात ताशेरे ओढलेत. हे एकीकडे होत असतानाच आज पारनेरात अजित पवारांच्या बॅनरवर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो झळकले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खुमासदार चर्चा रंगल्या आहेत.

Ahmednagarlive24 Office