अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शरद पवार यांना निवेदन देऊन वंचित शेतकऱ्यांचा कर्जमाफीसाठी विचार करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान पवार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले, की भाजप सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेपाठोपाठ महाविकास आघाडी सरकारच्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेपासूनही जिल्ह्यातील हजारो शेतकरी वंचित राहिले आहेत.
दोन्ही योजना राबवताना तारखेच्या घोळात शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. संबंधित शेतकरी थकबाकीदार राहिले. परिणामी त्यांना नवीन कर्ज मिळेना.
याबाबत वंचित शेतकऱ्यांनी रविवारी शेंडी-भंडारदरा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांची भेट घेतली. दोन्ही योजनांच्या लाभापासून राज्यातील शेतकरी वंचित आहेत, याचा विचार सरकारने करावा, अशी मागणी पवार यांच्याकडे करण्यात आली.