दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव निघाल्यानंतर ‘ती’ शाळा आजपासून सुरू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील एका विद्यालयाचे दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव निघाल्यानंतर आठ दिवस शाळा व्यवस्थापनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानंतर आता सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांचे रिपोर्ट निगेटिव आले असल्याने सोमवार दि.७ डिसेंबर पासून विद्यालय पूर्ववत सुरू होत असल्याची माहिती विद्यालयाच्या प्राचार्यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, सोमवारपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले असून, विद्यालयात प्रवेश करतानाच विद्यार्थ्याला मास्क दिले जाणार आहे.

त्याच बरोबर सॅनिटाईजचा वापर करून वर्गातही विद्यार्थ्यांना सोशल डिस्टंसिंग ठेवून शिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे कोरोना बाबतची सर्व खबरदारी विद्यालयाकडून घेण्यात आलेली आहे.

यावर्षीचा शैक्षणिक टप्पा आता अंतिम टप्यात आला असल्याने नववी दहावी अकरावी बारावीचे वर्गातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यास महत्त्वाचा असून अनेक मुलं घरीच थांबून ऑनलाईन अभ्यास करत असले तरी

विद्यालयाने शिक्षण विभागाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करत विद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या अनुषंगाने नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24