अहमदनगर बातम्या

पतीला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला आता न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे.

मनोज भालचंद्र जाधव (रेणुकानगर बोल्हेगाव अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे, त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, फिर्यादी महिला व मनोज भालचंद्र जाधव यांची मैत्री होती त्यानंतर त्यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाले ऑक्टोबर २०२१ मध्ये मनोज त्याच्यासोबत महिला एमआयडीसी येथील साईबन

येथे गेल्यानंतर फिर्यादी महिलेस पाणी पिल्याने झोप आली, मग त्याने तिच्या सोबत संबंध केले ही गोष्ट कोणाला सांगितली, तर नवर्‍याला ठार मारण्याची धमकी दिली होती.

तसेच चांदबीबी महाल येथे देखिल नवऱ्याला ठार मारण्याची धमकी देत मनोज आणि फिर्यादी महिले सोबत संबंध केले होते. फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केला.

या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर तोफखाना पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे .

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office