शेठजी व कामगाराने दुकानातीलच महिलेसोबत करायचे नको ते कृत्य ! ‘ती’ने औषध घेतल्यावर ‘नाजूक’ कारनामे उघड, अहमदनगरमधील घटना

Ahmednagarlive24 office
Published:
breaking

राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड महामार्गालगत असलेल्या एका मोठ्या किराणा व्यापाऱ्याने व तेथील एका कामगाराने त्यांच्याच दुकानात काम करणाऱ्या एका विवाहितेची छेड काढली.

बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे त्या विवाहितेने व्यापारी आणि कामगाराच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. तिच्यावर राहुरी फॅक्टरी येथील एका रूग्णालयात उपचार चालू आहेत.

यापूर्वीही याच व्यापाऱ्याने त्याच्याच दुकानात काम करणाऱ्या एका विवाहित महिलेची वारंवार छेड काढून तिला त्रास दिल्याने तिच्या पतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, याबाबत संबंधित व्यापारी आणि कामगारावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी व संबंधित पीडित महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे.

त्या व्यापाऱ्याची अशी अनेक नाजूक प्रकरणे असून या घटनेबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. नगर-मनमाड महामार्गालगत असलेल्या त्या व्यापाऱ्याच्या किराणा दुकानात ही पीडित महिला बऱ्याच दिवसांपासून कामाला आहे.

मात्र, तिला तो शेठ व कामगार अनेकदा दुकानातच तिची छेड काढतात. तिच्याबरोबर वारंवार लगट करतात. यावर त्या विवाहितेने त्यांना अनेकदा विरोध केला. मात्र, तिला धमकी देत त्यांनी छेड काढण्याचे उद्योग सुरूच ठेवले.

या त्यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून त्या विवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला तातडीने एका रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्या व्यापाऱ्याचे यापूर्वीचेही अनेक नाजूक कारनामे उजेडात आले आहेत.

त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, या पीडित महिलेने कोणतीही तक्रार दाखल करू नये, म्हणून काही राजकीय स्थानिक नेते हस्तक्षेप करीत असल्याची चर्चा होत आहे. हे प्रकरण दडपण्यात येत असल्याचे समजताच पीडितेच्या नातेवाईकांनी आम्हाला न्याय देण्याची मागणी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe