Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर येथील शनिदेवांचा महिमा अगाध आहे. त्यांच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. नेते मंडळी, अभिनेते येथे दर्शनासाठी रांग लावत असतात. काल रविवारी प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने शनिशिंगणापूर येथे येत शनिदर्शन घेतले. अभिनेत्री शनी चरणी लिन झाल्याचे पाहायला मिळाले.
शिल्पा शेट्टी हिने चौथऱ्यावर जावून शनिदेवास तेलाभिषेक केला. देवस्थान कार्यालयात यावेळी कोषाध्यक्ष दीपक दरंदले, शिंगणापूरचे पोलिस पाटील सयाराम बानकर यांनी अभिनेत्री शेट्टी यांचा सत्कार केला. तिने साधारण सकाळी अकरा वाजता शनिदेवांचे दर्शन घेतले.
सलग सुट्ट्यांमुळे गर्दी
मागील आठवड्यात सलग तीन दिवस सुट्टी आली होती. शुक्रवार, शनिवार, रविवार पाठोपाठ लागून आल्याने सुट्टयांमुळे शिंगणापूरला भाविकांचा ओघ वाढला आहे. दुपारनंतर भाविकांची गर्दी वाढत गेली.
शनिवारी व रविवारी शिंगणापूर मार्गावर घोडेगाव व राहुरी मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली होती. देवस्थान अध्यक्ष भागवत बानकर व मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदले यांनी गर्दीच्या पाश्र्भूमीवर कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. सर्व नियोजन व्यवस्थित असल्याने सुव्यवस्थित सर्वांचे दर्शन झाले.