Shirdi Coronavirus Vaccine : शिर्डी सज्ज , दसऱ्यापर्यंत 90 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :-   महाराष्ट्र शासनाच्या दि.8 व 14 ऑक्टोंबर दरम्यान राबविल्या जाणाऱ्या ‘मिशन कवचकुंडले’ या विशेष लसीकरण मोहीमेसाठी शिर्डी उपविभाग प्रशासन सज्ज झाले आहे. या मोहीमेत गाव, वाड्या, वस्त्यांमध्ये लसीकरण कॅम्प लावून दसऱ्यापर्यंत 90 टक्के लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे.

अशी माहिती शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली आहे. या मोहिमेला आजपासून शिर्डी उपविभागातील राहाता व कोपरगांव या दोन्ही तालुक्यांमध्ये सुरूवात झाली आहे. यासाठी महसूल, आरोग्य, जिल्हा परिषद व नगरपरिषद प्रशासनाचे एकमेकांच्या समन्वयाने जय्यत तयारी केली आहे.

शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन मिशन कवचकुंडले मोहिमेसाठी मिशन मोडवर काम करत आहे. राहाता मधील कोल्हार, भगवतीपूर, पाथरे, हणमंतगाव, लोहगांव, बाभळेश्वर, तिसगांववाढी, दाढ, डोऱ्हाळे, साकुरी, कनकुरी, कोऱ्हाळे, लोणी बु./खु., हसनापूर,

चंद्रापूर, प्रवरानगर, चंद्रापूर, गोगलगाव, अस्तगांव आदी 60-65 गावांमध्ये दररोज 15 हजार कोवीड डोसच्या माध्यमातून लसीकरण करण्यात येणार आहे. कोपरगांव तालुक्यात सांगवी भुसार, वडगांव, वेळापूर, दहिगांव बोलका,तळेगांव मळे, पढेगांव, तिळवणी, रांजणगांव देशमुख, बहादरपूर,संवत्सर,

कोकमठाण, शिंगणापूर, नाटेगाव, रवंदे, वारी ,धोत्रे, भोजडे, (घनघाव वस्ती), सडे या गावांमध्ये 3900 डोसचे लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच मुस्लीम समाजातील नागरिकांचा लसीकरणाचा टक्का वाढावा यासाठी कोपरगांव शहरातील 6 मस्जीदींमध्ये दररोज 1800 डोसचे लसीकरण करण्यात येणार आहे.

तसेच कोपरगांव ग्रामीण रूग्णालयात दररोज सर्व नागरिकांसाठी 1000 डोसचे लसीकरण करण्यात येणार आहे. कोपरगांव व राहाता मधील प्रत्येक गावांमध्ये लसीकरणाबरोबरच कोरोना प्रतिबंध व जनजागृती करण्यासाठी ग्राम दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

लसीकरणापूर्वी गावोगावी दवंडी, विद्यार्थ्यांच्या रॅली व ध्वनिक्षेपकांवरून जनजागृती करण्यात येणार आहे. शहरी आरोग्य केंद्र, तालुका ग्रामीण रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून ही मोहिम राबविण्यात येत आहे. आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक,

तलाठी, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संस्था, बिगर शासकीय संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. या मोहिमेत राहाता व कोपरगांवचे अनुक्रमे तहसीलदार कुंदन हिरे,

विजय बोरूडे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, सचिन सुर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रमोद म्हस्के, डॉ.विकास घोलप, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, चंद्रकांत चव्हाण, शांताराम गोसावी, महारुद्र गालट तसेच डॉ.वैशाली बडदे, शहरी आरोग्याच्या डॉ.गायत्री कांडेकर,

ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.गोकुळ घोगरे, डॉ.कृष्णा फुलसौंदर, साथ नियंत्रण अधिकारी सचिन जोशी आदी अधिकारी या मोहिमेत परिश्रम घेत आहेत.

जिल्ह्यात तिसऱ्या लाटेला थोपवायचे असेल, तर १८ वर्षे पुढील सर्व वयोगटांचे दुसऱ्या डोससह १०० टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे. असे आवाहन श्री.गोविंद शिंदे यांनी केले आहे.