Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा विभाजना संदर्भात आज रविवारी सायंकाळी पाच वाजता येथील संगमनेर रोड समोरील शासकीय विश्रामगृह येथे महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समिती अध्यक्ष समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी प्रसिद्धी पत्रकद्वारे दिली.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे ही, श्रीरामपूरकरांची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे.
परंतु आपली एकी नसल्यामुळे काहींनी झोपेचे सोंग घेतल्यामुळे झोपलेल्या माणसाला जागी करता येतं परंतु, झोपेचे सोंग घेतलेल्या माणसाला जागे करता येत नाही. याच संधीचा फायदा घेऊन लोणीकरांनी नगर जिल्हा विभाजनाच्या हालचाली सुरू केल्या आहे.
शिर्डीमध्ये उभ्या राहणाऱ्या विविध सरकारी कार्यालय इमारती पाहता नगर जिल्हा विभाजनानंतर शिर्डी हे मुख्यालयाचे ठिकाण निश्चित करण्याचा घाट घातला जात आहे. शिर्डीला जिल्ह्याचे मुख्यालय होऊन न देण्यासाठी
सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून झोपल्याचं सोंग घेतलेल्यांनी जागे घेऊन श्रीरामपूर भकास होण्यापासून श्रीरामपूरचे बाजारपेठ उध्वस्त होण्यापासून प्रत्येक घरातल्या प्रत्येक नागरिकांनी छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी श्रीरामपूर जिल्हा करण्यासाठी व्यापक लढा उभारण्यासाठी श्रीरामपूरकरांचे अस्तित्व जागृत करण्यासाठी मिटींगचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यामुळे या बैठकीला जास्तीत जास्त व्यापारी व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आव्हान स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन, कार्याध्यक्ष बाबासाहेब शिंदे, उपाध्यक्ष संदीप मगर, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, अशोक उपाध्ये, तसेच स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.