अहमदनगर बातम्या

शिर्डी नगरपंचायत निवडणुक ! ‘त्या’ दोन उमेदवारांना बिनविरोध करावे

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :-  शिर्डी नगरपंचायत निवडणुकीत दाखल दोन उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी मागे न घेतल्यामुळे सौ.अनिता सुरेश आरणे व सुरेश काळू आरणे या दोन उमेदवारांना बिनविरोध करण्याची परवानगी निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे मागितली आहे.(Nagar Panchayat elections) 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, शिर्डी नगरपंचायत निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर शिर्डी ग्रामस्थांनी शिर्डी नगरपरिषद करावी म्हणून या निवडणुकीवर सर्वानुमते सर्वपक्षीयांनी बहिष्कार टाकला होता.

हा बहिष्कार जवळपास यशस्वीही झाला. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतीम दिवशी 17 प्रभागांपैकी फक्त 2 प्रभागांमधून सौ.अनिता सुरेश आरणे व सुरेश काळू आरणे या पती पत्नीने त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले.

सोमवार दि.13 रोजी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सौ.अनिता आरणे व सुरेश आरणे यांनी त्यांचे उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी गोविंद शिंदे

यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे हे उमेदवार बिनविरोध करण्याची परवानगी मागितली आहे. राज्य निवडणूक आयोगाने तशी परवानगी दिल्यास या दोन्ही उमेदवारांना बिनविरोध घोषीत करून बिनविरोध निवडून आल्याचे प्रमाणात पत्र दिले जाईल.

Ahmednagarlive24 Office