अहमदनगर बातम्या

Shirdi News : साईबाबा हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे कौतुक ; सर्पदंश झालेल्या १७ वर्षीय रुग्णांचे वाचविले प्राण !

Published by
Ahmednagarlive24 Office

काही तासांत जीव घेणारा व अतिविषारी असणाऱ्या मन्यार जातीच्या सापाचा दंश झालेल्या १७ वर्षीय तरुणांस श्री साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील डॉक्टरांनी जीवदान दिले आहे. साईबाबांच्या रुग्णसेवेचा वारसा डॉ. अभिमन्यू कडू पुढे नेत आहेत.

त्यांच्यासह सहकाऱ्यांवर रुग्णांच्या नातेवाइकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. याबाबत रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉ. शैलेश ओक यांनी याबाबत माहिती देताना सांगितले,

की राहाता तालुक्यातील रुई कोहकी येथील अंबादास माळी हे दि. ३ फेब्रुवारी रोजी शेतातील गहू पिकास पाणी भरत असताना दुपारी चार वाजेच्या सुमारास त्यांच्या समवेत असलेला मुलगा गोकुळ अंबादास माळी (वय १७, रा रुई कोहकी ) यास पायाला काही चावल्यासारखे जाणवले.

काय चावले असेल, हे त्याच्या लक्षात आले नाही, परंतु गव्हाच्या पिकात संशयात्मक हालचाली जाणवल्यावरुन बहुतेक सर्प असावा, असा संशय त्यांना आला. त्यांच्या वडिलांनी तातडीने वेळ न गमवता रुग्णाला शिर्डीतील श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी अपघात विभाग येथे आणले.

त्यावेळी फिजीशियन डॉ. अभिमन्यु शंकरराव कडु हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होते. त्यांनी तातडीने रुग्णाची तपासणी करुन आयसीयु (अतिदक्षता) विभागात पुढील उपचारासाठी भरती केले. रुग्णाची तपासणी केली असता, असे लक्षात आले की, सर्पदंश झालेला आहे; परंतु कोणत्या जातीच्या सर्पाने दंश केला, हे शोधनं डॉक्टरांपुढे मोठे आव्हान होते.

दरम्यानच्या काळात रुग्णाच्या दंश झालेल्या भागावर सुज येण्यास सुरुवात झाली. रुग्ण अवघ्या काही मिनिटात बेशुद्ध झाला असता; परंतु डॉ. कडु यांनी आपल्या अनुभवानुसार रुग्णाला मन्यार जातीच्या सर्पाने दंश केला आहे, असे निदान करुन लगेच उपचार चालु केले.

हळुहळु स्रणात सुधारणा होवुन १२ दिवसांच्या डॉक्टरांच्या व टीमच्या अथक प्रयत्नानंतर रुग्ण पुर्णपणे बरा होऊन घरी गेला. याबाबत डॉ. अभिमन्यु शंकरराव कडु यांनी संवाद साधताना सांगीतले की, मन्यार जातीचा सर्प हा अतिविषारी आहे. त्याचा दंश झालेनंतर काही क्षणात रक्तादवारे मेंदुत विष पसरते व रुग्ण दगावण्याची शक्यता जास्त असते;

परंतु रुग्णास वेळेत योग्य उपचार मिळाले, त्यामुळे रुग्णाचे प्राण वाचविता आले. सर्पदंश झाल्यास कुठलेही गावठी उपचार न घेता ताबडतोब जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावेत, असे आवाहन डॉ. कडु यांनी केले.

Ahmednagarlive24 Office