इंदोरीकर महाराज यांच्या समर्थनात शिवसेना महिला संघटना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 :निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्यावर दाखल झालेली तक्रार मागे घेण्यासाठी संगमनेर शिवसेना महिला संघटना, गोवंश हत्या विरोधी संघटना तसेच संगमनेर शिवसेनेच्या वतीने पोलिस व महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

महाराजांच्या समर्थनार्थ अनेक संघटना आता सरसावल्या आहेत. निवृत्ती महाराजांवरील तक्रार मागे घ्यावी; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पोलिस निरीक्षक अभय परमार, नायब तहसीलदार सातपुते यांना निवेदनातून देण्यात आला.

शिवसेना तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, पं. स. सदस्य अशोक सातपुते, शहरप्रमुख अमर कतारी, राजू सातपुते, महिला उपजिल्हाप्रमुख सुरेखा गुंजाळ, तालुकाप्रमुख शीतल हासे, रेणुका शिंदे यावेळी उपस्थित होते.

तक्रार मागे घेण्यासाठी विविध सामाजिक संघटना आक्रमक आहेत. महाराजांच्या समर्थनार्थ विविध संघटना आता सरसावल्या.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24