भाजपच्या जीवावरच शिवसेनेचे राजकारण !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- निवडणूक एकत्रित लढवली मात्र निकालानंतर भाजपची फसवणूक करून,विरोधी विचारसरणी असणाऱ्या पक्षासोबत सत्तेसाठी शिवसेनेने घरोबा केला.

एकेकाळी पुलोद आघाडीने शिवसेनेला सोबत घेण्याचे टाळले होते.त्यानंतर मात्र भाजपने शिवसेनेला सोबत घेऊन युती केली होती. त्यावर्षी शिवसेनेकडे चिन्ह देखील नव्हते.

त्यांनी भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवली होती. यामुळे सेनेच्या जीवावर भाजप नसून भाजपच्या जीवावरच शिवसेनेचे राजकारण अाहे, असे टीकास्त्र भाजपचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी यांनी शिवसेनेवर सोडले. महात्मा गांधी जयंती निमित्त नगरपालिकेच्या

पुढाकारातून स्वच्छता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन वीर सावरकर मैदान येथे करण्यात आले होते.यावेळी सावजी बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, सोमनाथ खेडकर, नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके,

नितीन दहिवाळकर, नितीन एडके, प्रमोद भांडकर, अजय रक्ताटे, शुभम गाडे, अशोक चोरमले आदी उपस्थित होते. कोरोना महामारी च्या काळामध्ये राज्य सरकारसह विरोधक अस्तित्वहीन आहेत. गेल्या सहा महिन्यापासून संपूर्ण देशभरात सामान्यांना सर्वाधिक मदत भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली.

आगामी काळात देखील पक्ष गरजवंताच्या सेवेसाठी तत्पर राहील. अवघे २ खासदार असणारा पक्ष काही वर्षातच ३०३ खासदारांपर्यंत जाऊन पोहोचतो, यातच पक्ष व कार्यकर्त्यांच्या सामाजिक कार्याचे योगदान लक्षात येते. प्रचंड भ्रष्टाचार, आतंकवाद, जातीय द्वेष,

दंगली घडवण्याचे कट-कारस्थान अशा प्रकारचे राजकारण करून व सामाजिक तेढ निर्माण करून काँग्रेसने अनेक वर्षे सत्ता उप भोगली. मात्र सर्वसामान्यांसाठी त्यांना काही करता आले नाही. याला वैतागून नागरिकांनी भाजपला पसंती दिली, असे सावजी म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24