भाविकांच्या भावनेला धक्का; मंदिरासमोरच मांडले ठिय्या आंदोलन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने राज्य शासनाने राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यास अद्यापही परवानगी दिलेली नाही.

सर्व सणउत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. यातच कर्जत तालुक्यातील एका मंदिरातील धार्मिकतेच्या मुद्द्यावरून भाविकांमध्ये नाराजी निर्माण झाली व यामुळे मंदिरासमोरच ठिय्या आंदोलन पुकारणात आले.

कर्जत तालुक्यातील राशीन येथे विजयादशमीला यमाईदेवीस फूल लावून कौल न मागितल्यामुळे भाविकांमध्ये नाराजी आहे. किमान आता कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी देवीला कौल लावावा, या मागणीसाठी आज मंदिरासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादीचे युवक नेते शहाजी राजेभोसले, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख सुभाष जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी आंदोलनात भाग घेतला. दरम्यान, याच मागणीसाठी आज राशीनमध्ये कडकडीत “बंद’ पाळण्यात आला. चंद्रकांत जगताप, रजनी निंभोरे यांच्यासह आराधी मंडळींनी देवीची गाणी म्हणत रस्त्यावर ठिय्या दिला.

यावेळी आंदोलनकर्ते जाधव म्हणाले, की देवीस कौल न लावल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर मंदिर परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त दिला होता. पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24