धक्कादायक! महिलेच्या तोंडाला कापड बांधून डोक्यात टाकला दगड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :-  संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथे महिलेच्या तोंडाला कापड बांधून डोक्यात दगड टाकून गंभीर जखमी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

या प्रकरणी चौघांवर घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारभारी मुरलीधर भागवत, आदिनाथ कारभारी भागवत, शिवा व त्याचा जोडीदार या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहिती अशी: अस्मिता पोपट करंजेकर ही महिला नांदूर खंदरमाळ शिवारातील बोरपुंड येथे शेतात कांद्याची खुरपणी करत होती.

कारभारी व त्याचा मुलगा आदिनाथ भागवत यांनी जुन्या भांडणावरून शिवा व त्याच्या जोडीदारास अस्मिताला मारहाण करण्यास सांगितली.

तिच्या तोंडावर पांढरे कापड टाकून तिच्या डोक्यात दगड टाकण्यात आला. यात ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास पोलिस नाईक आर. ए. लांघे करीत आहेत.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24