धक्कदायक! १५ वर्षांपूर्वी मेलेली महिला आली पोलीस ठाण्यात; महिलेची बलात्काराची तक्रार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १५ वर्षांपूर्वी मेलेली महिला पोलीस ठाण्यात येऊन चुलत भावांनी माझ्यावर अत्याचार केला अशी तक्रार देते तर नातेवाईक म्हणतात, ती १५ वर्षापूर्वीच मेलीये, तसे प्रमाणपत्रही देतात.

तर पोलीस म्हणतात, ती जिवंत आहे. सदर २५ वर्षीय महिलेने तिच्याच चुलत भावांविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरोधात अनैसर्गिक अत्याचार, विनयभंग, पळवून नेणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी यातील दोघा भावांना अटक केली़ या दोघांना न्यायालयाने प्रथम तीन दिवसांची पोलीस कोठडी दिल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली़ .

अटकेत असलेल्या दोघा भावांच्या आईने १९ ऑक्टोबर रोजी पोलीस अधीक्षकांना निवेदन देत फिर्यादी महिलेचा २००५ मध्येच मृत्यू झाल्याचा दावा करत मृत्यूचे प्रमाणपत्रही सादर केले.

महिलेचा शहरातील आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये ३० सप्टेंबर २००५ रोजी मृत्यू झाल्याची महानगरपालिकेत नोंद असल्याचे प्रमाणपत्रच संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी दिले आहे़

तर फिर्यादी महिलेचे आधार कार्ड आमच्याकडे असून हीच महिला खरी असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. . या परस्पर दाव्यांमुळे पोलीस यंत्रणाही चक्रावून गेली असून पुढे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24