अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-एका ऊसाच्या शेतात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान हा खळबळजनक प्रकार श्रीगोंदा तालुक्यात घडला आहे.
समजलेल्या अधिक माहितीनुसार मृत महिलेच्या डोक्यात काहीतरी टणक वस्तू मारुन खून करुन तो मृतदेह उसाच्या शेतात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रकार घडला आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर गावच्या शिवारात कुणीतरी अज्ञात व्यक्तीने लता मधुकर शिंदे (वय ५६, रा. विसापूर) या महिलेला डोक्याचे पाठीमागील बाजूस टणक वस्तूने मारुन खून करून उसाच्या शेतात मृतदेह टाकून पुरावा नष्ट केला आहे.
याप्रकरणी विसापूर येथील बाळू शिंदे (वय ५३) यांनी बेलवंडी पोलिसात फिर्याद दिल्यावरुन अज्ञात आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ‘दरम्यान घटनास्थळी कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव बेलवंडी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरविंद माने , पो. कॉ. बोराडे व बारवकर यांनी भेट दिली असून या प्रकरणातील आरोपींचा बेलवंडी पोलीस शोध घेत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved