अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथील जंगलात विवाहीत प्रेमी युगुलांनी गळफास घेत जीवन यात्रा संपाविल्याची घटना घडली आहे. ही आत्महत्या की घातपात अशी चर्चा असून यामुळे परिसरात भिती व्यक्त होत आहे .
राजेंद्र कोंडीभाऊ केदार (30, रा. मांडओहळ खडकवाडी ता .पारनेर) व नानुबाई पोपट चिकणे (27, रा . मेनडोह पळशी ता .पारनेर) अशी आत्महत्या करणार्या प्रेमीयुगलांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, यातील दोन्ही मयत हे विवाहित असून संसारी आहेत राजेंद्र केदार यांना पत्नी आणि एक मुलगी आहे तर नानुबाई या विवाहित असूनही दोघांचे गेले वर्षभरापासून प्रेम संबंध होते.
वर्षभरापूर्वी मोठा वाद निर्माण झाला होता नातेवाईकांच्या मध्यस्थीने तो वाद मिटला गेला आणि दोघेही एकत्र राहू लागले होतो. त्यांनी आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला याबाबत निश्चित माहिती मिळू शकली नाही.
घटनेची माहिती समजताच पारनेर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तर दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.