अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-महिला अत्याचाराच्या घटनां काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे . दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे जिल्ह्यातील महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे.
नुकतेच राहुरी तालुक्यात एका महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. राहुरी कारखाना येथील प्रसादनगर परिसरात आरोपीने घरात घुसून महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याची घटना घडली आहे.
तसेच जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी आकाश बोरुडे याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, महिलेच्या घरात साडे आठ वाजेच्या सुमारास अनधिकाराने घुसून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने तसेच तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देण्यात आली.
याबाबत पिडीत महिलेने राहुरी पोलिसांत फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून आकाश बोरुडे याच्याविरोधात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास सहायक फौजदार गायकवाड हे करीत आहे. नगर जिल्ह्यात महिलेवरील अत्याचाराचे गुन्हे हे अधिक प्रमाणात वाढलेले दिसून येत आहे.