अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :राज्यासह जिल्ह्यात कोरोना धुमाकूळ घातला आहे. अहमदनगर शहरासह विविध तालुक्यात रोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळत असताना मात्र शहरापासून केवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या भिंगार उपनगरात अद्याप एकही रुग्ण आढळून आला नव्हता.
मात्र काळ या भागातील एकास कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. शहरातील अनेक भाग असे आहेत की, तेथे कालपर्यंत कोरोनाबाधीत रुग्ण आढळले नव्हते.
आता त्या भागात देखील रुग्ण आढल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशानाने केले आहे. शहरात काल आणखी १३ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले आहे. त्यात पाईपलाईन रोड, तोफखाना, आडते बाजार, भिंगार येथील व्यक्तींचा समावेश आहे.
त्यामुळे जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या ४२२ वर पोहचली आहे. शहरातील भिंगार परिसरात अद्यापर्यंत करोनाचा शिरकाव झाला नव्हता, मात्र आता झाला आहे. शहरात आज सायंकाळी एकूण १३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले.
यामध्ये नगर शहरातील तोफखाना भागातील पाच, ढवण वस्ती येथील एक, पाईपलाईन पद्मानगर येथील एक, आडते बाजार येथील पाच आणि भिंगार येथील एक रुग्ण बाधित आढळून आले आहे.
तसेच सकाळी १२ व्यक्ती बाधित आढळून आल्या होत्या. दिवसभरात एकूण २५ बाधितांची भर पडली आहे. जिल्ह्यात १२ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये संगमनेर तालुक्यातील सहा, अकोले आणि पारनेर तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला.
संगमनेर तालुक्यात कुरण येथे दोन, पिंपरणे आणि साकुर येथे एक आणि संगमनेर शहरात हुसेननगर आणि लखमिपुरा येथे एक बाधित रुग्ण आढळून आला.पारनेर तालुक्यातील गोरेगाव आणि अकोले शहरातील कांदा मार्केट येथे प्रत्येकी एक बाधित रुग्ण आढळून आले.
यामुळे जिल्ह्यातील ऍक्टिव रुग्ण संख्या आता १२५ झाली आहे. तसेच ७० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचा माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews