धक्कादायक! ‘ह्या’ शहरात कोरोनाचा उद्रेक; नगराध्यक्ष म्हणतात धोका वाढल्याने करावे ‘असे’ काही

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. कोरोना रुग्णांची संख्या आता २० हजारीकडे वाटचाल करत आहे.

ग्रामीण भागांत कोरोनाने शिरकाव केल्यानंतर हे प्रमाण जास्त वाढले. याला कोपरगाव तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. मागील काही आठवड्यांपासून कोपरगाव तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

कोरोनाचा एवढा उद्रेक झाला आहे की, सध्या कोपरगाव शहरच कोरोनाग्रस्त होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमध्ये जनता संचारबंदीची गरज आहे असे मत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी व्यक्त केले.

नगराध्यक्ष वहाडणे म्हणाले, कोपरगाव शहर व तालुक्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोठी घबराट उडालेली आहे. दररोज रुग्ण संख्या वाढत असून अनेक बळी पडताहेत.

अनेक परिवार कोरोना पीडित झाल्यामुळे जनता सैरभैर झालेली आहे. शासन प्रशासनाची भूमिका पुन्हा लॉकडाऊन करण्याची नाही. पण धोका वाढलेला आहे.

नगरमध्ये स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करायला दोन दोन दिवस नंबर लागत नाहीत. आपल्या कोपरगाववर अशी परिस्थिती येऊ नये इतकीच माझी प्रामाणिक अपेक्षा आहे.

ज्या कुटुंबातील काही बळी गेले, जे कोव्हिडग्रस्त अ‍ॅडमिट आहेत. त्यांच्या मनस्थितीचा व शहरावर आलेल्या या भीषण परिस्थितीचा सर्वांनीच गंभीरपणे विचार करावा, असे आवाहन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले आहे.

दरम्यान ही वाढती रुग्णसंख्या पाहता सर्वानी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे , सुरक्षा बाळगावी आणि आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24