अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- चुकीचे बी बियाणे किंवा चुकीची औषधे यांमुळे शेतकऱ्याचे नेहमीच नुकसान होत असते. मागे सोयाबीन आणि बाजरी पिकांच्या बियानाबाबतही असेच घडले.
आता पुन्हा श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील चंद्रकांत कुटे या शेतकर्यांला कपाशीवरील कीड नियंत्रणासाठी चुकीचे औषधे दिल्याने या शेतकर्याची 50 गुंठे कपाशी जळण्याच्या मार्गावर आहे.
अधिक माहिती अशी: सदर शेतकऱ्याची कपाशी दोन ते तीन फूट वाढली असताना त्यावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी गावातील कृषी सेवा केंद्रातून कपाशीवर मारण्यासाठी औषध घेतले.
याची फवारणी केंद्र चालकांनी सांगितलेल्या प्रमाणात केली मात्र एक तासात कपाशी सुकत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर तातडीने कुटे यांनी याबाबत कृषी केंद्र चालकाला माहिती दिली.
कृषी केंद्र चालक हा उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने याबाबत तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांच्याकडे तक्रार केली.
तालुका कृषी अधिकारी म्हस्के यांनी कृषी सल्लागार मंडळाच्या सदस्यांसह भेट घेऊन उपाययोजना सुचवल्या मात्र यानंतर देखील कपाशी लाल पडली व कपाशीला बोंडे लागली नाहीत.
संबंधित शेतकर्याने नुकसान भरपाईची मागणी केली असता कृषी केंद्र चालक प्रतिसाद देत नसल्याने याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved