धक्कादायक! जिल्हा बँकेचे कर्मचारी असुरक्षित; होतोय ‘हा’ आरोप

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- सध्या कोरोनाची परिस्थिती पाहता या पार्श्वभूमीवर जी काळजी घ्यायला हवी ती घेतली जात नाही. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचार्‍यांचे आरोग्य असुरक्षित झाले आहे असाआरोप जिल्हा सहकारी बँक्स एम्पलॉईज युनियनच्यावतीने करण्यात आला आहे.

बँक प्रशासनाशी युनियनच्या पदाधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने भेट घेऊन चर्चा केली होती. त्यावेळी बँक प्रशासनाने कर्मचार्‍यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने सूचना व मार्गदर्शक तत्वांचे तंतोतंत पालन करण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र, सध्या बँकेच्या कर्मचार्‍यांमध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झाली असून, भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. संस्थेच्यादृष्टीने ही बाब योग्य नसल्याचे युनियनच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

* काय होतोय आरोप?

  • – बँकेच्या जिल्हा भरातील शाखा या सरकारी नियमानुसार निर्जंतुकीकरण होत नाही.
  • – शाखेमध्ये सेवकांसाठी ग्राहकांसाठी सॅनिटायझर लिक्विड व उपकरणे उपलब्ध नाहीत.
  • – कर्मचार्‍यांना मास्क व हॅन्ड ग्लोज पुरवले जात नाही.
  • – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमा उतरविण्यात आला नाही.

दरम्यान, सध्या कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षित व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तातडीने त्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने काळजी घेऊन मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याची मागणी युनियनचे कार्यकारी अध्यक्ष धनंजय भंडारे यांनी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांच्याकडे केली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24