धक्कादायक! ‘ह्या’ साखर कारखान्याच्या 24 एकर जमिनीची अदलाबदल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- बचाव समितीचे रामदास घावटे यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. त्यात त्यांनी काही धक्कादायक गोष्टींचा उहापोह केला आहे.

त्यात त्यांनी म्हटल्याप्रमाणे, पारनेर सहकारी साखर कारखान्याची विक्री झाल्यानंतर कारखान्याकडे उरलेल्या 138 एकर जमिनीपैकी सुमारे 24 एकर जमीन पारनेरचा अवसायक यांनी क्रांती शुगरला बेकायदेशीर अदलाबदल करून दिली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणी झालेल्या नोंदी रद्द करण्याची मागणी संबंधितांकडे करणार

असून मागणीला दाद न दिल्यास अवसायक व त्याच्या गैरकारभारा विरोधात न्यायालयात खटला दाखल करू, असे घावटे यांनी म्हटले आहे. त्यांनी प्रसिद्धी पत्रकात दिल्याप्रमाणे, माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार पारनेर कारखाना विक्री केला. तेव्हा ज्या जमिनीवर तो उभा आहे, ती जमीन बँकेकडे तारण नव्हती.

आज जिथे कारखाना उभा आहे. ती जमीन कारखान्याकडे (अवसायाकाकडे) आहे. ही बाब कारखाना विकत घेणारे क्रांती शुगर यांना समजली. त्यानंतर क्रांती शुगर यांनी अवसायक यांना हाताशी धरून, प्रादेशिक साखर सहसंचालक अहमदनगर व साखर आयुक्त पुणे यांच्या मदतीने अदलाबदल करून घेतली आहे.

पारनेर कारखान्याच्या गट. नं. 433, 444 व 458 असे 9 हेक्टर 28 आर. जमीन ज्या जमिनीवर सध्या संपूर्ण कारखाना उभा आहे. ती संपूर्ण जागा क्रांती शुगरला देऊन त्या बदल्यात लोणीमावळा शिवेलगत असणारी गट नं. 455, 454, 456, 457 येथील पडित जमीन कारखान्याला देत

तसा दिनांक 11 फेब्रुवारी 2020 रोजी अदलाबदल दस्त (शून्य रुपये मोबदला) नोंद करून घेतला आहे. तसेच या अवसायकाने आजपर्यंत कोणतेही कामकाज न करता साडेसात कोटींचा खर्च दाखवला आहे. त्यामुळे अवसायक हटवण्यासाठी बचाव समितीने पत्रव्यहार केलेला होता;

परंतु याबाबत संबंधित प्रशासकीय अधिकारी एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचे बचाव समितीला मिळालेल्या उत्तरांवरून लक्षात येते असेही घावटे यांनी म्हटले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24