धक्कादायक! पारनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- सध्या सर्वत्र कोरोनाचे थैमान आहे. अनेक शहरांत परिस्थिती बिकट आहे. परंतु या महामारीच्या संकटात अनेक गुन्हेगारी कृत्ये घडल्याचे समोर आले आहे. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे यात समाविष्ट आहेत.

महिलांवरील अत्याचाराविरोधात अनेक कायदे, प्रबोधन होऊनही महिलांवरील अत्याचार कमी होत नसल्याचे वास्तव चित्र सध्या पाहायला मिळत आहे. पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील एका घटनेने सर्वाना हादरून सोडले आहे.

येथे एका अल्पवयीन मुलीवर प्रेमाची फुस लाउन दोघांनी वारंवार बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. विशाल नारायण भापकर ( वय २९ ). संतोष किसन चितळकर (वय २८) अशी आरोपींची नावे आहेत.

अधिक माहिती अशी: पिडीत अल्पवयीन मुलगी सन २०१९ मध्ये गणेशोत्सवानंतर आयोजित करण्यात आलेल्या सप्ताहाच्या कार्यक्रमास जात असताना तेथे मंडप लावलेला विशाल नारायण भापकर याने तिच्याशी ओळख वाढविली.

तिच्याशी फोनवर वारंवार संपर्क करून तिला प्रेमाच्या जाळयात ओढले. पिडीतेस तिच्याच शेतामध्ये भेटून तिचा विनयभंग करीत तिच्यावर वारंवार बलात्कार केला.

दुसरीकडे संतोष किसन चितळकर या नराधमाने पिडीतेस दुचाकीवरून शाळेत सोडण्याच्या बहाण्याने तिच्याशी ओळख वाढविली.

फोनवर वारंवार संपर्क करून तिला तिच्याच शेतामध्ये भेटून विनयभंग करीत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. दोघा नराधमांनी केलेल्या बलात्कारामुळे पिडीत मुलीस गर्भधारणा झाली.

ही बाब तिच्या घरातील सदस्यांच्या लक्षात आल्यानंतर तिची वैदयकिय तपासणी करण्यात आली. त्यात ती ३३ आठवडे व ६ दिवसांची गर्भावती असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24