अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील महांडूळवाडी येथे सुनेचा शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच सासुचाही मृतदेह तळ्यातील पाण्यावर तरंगताना मिळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे ही घटना दि 21 रोजी सकाळी घडली.
दि 13ऑगस्ट रोजी सकाळी महांडूळवाडी येथील सुप्रिया गुलदगड वय24 वर्षे या विवाहित महिलेचा ती शेतात गवत आणण्यासाठी गेली असता पाय घसरून शेततळ्यात पडल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती
या घटनेला आठ दिवस उलटत नाहीत तोपर्यंतच याच मयत महिलेची सासू सुमन गुलदगड वय 49 वर्ष यांचा मृतदेह तळ्यातील पाण्यावर तरंगताना मिळून आला आहे
सुनेचा मृत्यू होऊन आठ दिवस उलटत नाहीत तोच सासुचाही मृतदेह मिळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे , मयत सुमन गुलदगड यांच्या मृत्यूप्रकरणी पांडुरंग गुलदगड यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला खबर दिली असून
त्यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे खबरीत म्हंटले आहे की आज दि 21 रोजी सकाळी साडेसात वाजता पांडुरंग गुलदगड हे शेतात बैल चरण्यासाठी बांधायला गेले असता
त्याना तळ्याच्या पाण्यावर एका महिलेचे प्रेत तरंगताना दिसले त्यामुळे त्यांनी आपल्या पुतण्याला बोलावले दोघांनी पाहणी केली असता मयत महिला ही सुमन गुलदगड असल्याचे निष्पन्न झाले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved