अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-पाथर्डी तिसगाव शिवारात हरबऱ्याच्या शेतात नेऊन एका विवाहीतेवर गुरुवारी रात्री पावणेनऊ वाजता अत्याचार केला.
तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे ठार मारीन अशी धमकी देण्याची घटना घडली. याप्रकरणी योगेश पांडु कराळे (रा.सोमठाणे) याच्या विरुद्ध पोलिसांनी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदविला आहे.
याबाबत सविस्तर असे की, पाथर्डी शहरातील शेवगाव रस्त्याच्या बाजुला राहणारी विवाहित महिला तिसगावहुन पायी मांडवे गावाकडे जात होती.
शुक्रवारी (ता.७) रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास महिलेच्या ओळखीचा असलेला योगेश कराळे तेथे आला. कराळे याने महिलेला उचलुन शेजारीच असलेल्या हरबऱ्याच्या शेतात नेले. तेथे तिच्यावर अतिप्रसंग केला.
घडलेल्या घटनेबाबत कोणाला काही सांगितले तर तुला जिवे ठार मारील असी धमकी दिली. पोलिसांनी महिलेच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपअधिक्षक सुदर्शन मुंडे यांनी घटनास्थळाला भेट दिली.