अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाच्या संकटाने शेतकरी हैराण झाला होता. हे संकट काहीसे कमी झाले तर जिल्ह्यावर बिबट्याचे संकट घोंघावू लागले.
शेतकऱ्यांपुढील संकटाचा पाढा पुढे सुरूच राहिलेला असून आता एका नव्या संकटामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. ग्रामीण भागात जनावरांना होणार्या लंपी या संसर्गजन्य आजाराने डोके वर काढले आहे.
त्यामुळे पशुपालक शेतकरी चिंतेत पडले आहे. नगर जिल्ह्यातील १२ तालुक्यात ४६५ जनावरांना लंपीची बाधा झाली आहे. नेवासे तालुक्यात सगळ्यात आधी लंपीचा प्रादुर्भाव आढळून आला होतात.
त्यानंतर संगमनेर व श्रीरामपूर वगळता सर्वच तालुक्यात जनावरांना लंपीचा संसर्ग होत असल्याचे समोर आले आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे या जनावरांवर उपचार सुरु आहेत.
इतर गावात हा संसर्ग पसरु नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे उपाययोजना केल्या जात असून शेतकर्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.