अहमदनगर बातम्या

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीला पळवून नेले; या तालुक्यातील घटना

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑक्टोबर 2021 :- कर्जत तालुक्यातील कानगुडवाडी येथे अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी बेनवडी येथील एकाविरुद्ध कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, कानगुडवाडी येथील अल्पवयीन मुलीला १६ ऑक्टोबर रोजी पळवून नेले आहे.

या प्रकरणी चेतन बाळू धुमाळ (वय ३१) रा. बेनवडी, ता. कर्जत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मारुती काळे करत आहेत.

Ahmednagarlive24 Office