अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 : शहरासह उपनगरातही आता चोर्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे. माणिकनगर मध्ये आनंदऋषीजी हॉस्पिटलसमोरील गुरूदेव मेडिकल जनरल स्टोअर्स या मेडिकल दुकानाचे शटरचे कुलूप तोडुन कोणीतरी अज्ञात चोराने काऊंटरमधील 73 हजार रूपये रोख रक्कम चोरुन नेली आहे.
ही घटना गुरूवारी (दि.25) रात्री 11.30 ते शुक्रवारी (दि.26) सकाळी 8 च्या दरम्यान घडकीस आली आहे. याबाबतची मिळालेली माहिती अशी की, जयकुमार मुळचंद गांधी (वय-58, रा. निता अपार्टमेंट, माणिकनगर) यांचे आनंदऋषीजी हॉस्पिटलसमोर गुरूदेव मेडिकल अॅण्ड जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे.
गांधी हे गुरूवारी रात्री 11.30 च्या सुमारास त्यांनी दुकान बंद केले आणि शुक्रवारी सकाळी 8 च्या सुमारास ते दुकान उघडण्यास आले असता दुकानाचे शटर व कुलूप तुटलेले त्यांना आढळले.
त्यांनी आत जाऊन पाहिले असता गल्ल्यातील 73 हजार रूपये रोख चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने कोतवाली पोलिस स्टेशनची संपर्क साधुन सदर घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिस घटनास्थळी पोहोचले त्यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून चौकशी केली. याप्रकरणी जयकुमार गांधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी भारतीय दंड विधान कायदा कलम 457, 380 प्रमाणे घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews