अहमदनगर बातम्या

धक्कादायक : खून करुन मृतदेह फेकला महामार्गावर

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- नगर-मनमाड महामार्गावरील सावळीविहीर नजीक ट्रक चालवण्यावरून दोन चालकांमध्ये वाद हवून एकाचा खुन केल्याची घटना घडली . रमेश राऊत स्वतःहुन पोलीस ठाण्यात हजर झाला असून त्यास पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, काल अकलूज न भरलेला मालट्रक इंदोरकडे जात असताना राहाता तालुक्यात चालू गाडीतून एक मृतदेह रस्त्यावर फेकून देऊन ट्रकचालक मालट्रक घेऊन थेट कोपरगाव पोलीस स्टेशनला हजर झाला.

पोलिसांनी आरोपी रमेश मदन राऊत यास शिर्डी पोलिसांच्या वाली केले. तात्काळ शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

आरोपी रमेश मदन राऊत याची शिर्डी पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्याने सांगितले की, मयत ट्रकचालक रामसिंग ( रा. इंदौर, मध्यप्रदेश) याच्याबरोबर गाडी चालवण्यावरून

वाद झाल्याने कॅबिनमधून रॉड आणि व्हिल पान्हा डोक्यात मारून त्याचा खून करुन मृतदेह नगर-मनमाड महामार्गावर सावळीविहीर नजीक फेकून दिला.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office