धक्कादायक!! बांगलादेशी नागरिकांची सुपा ग्रामपंचायत मतदार यादीत नावे, लोकप्रतिनिधींनी ही बोगस नोंदनी केल्याचा मनसेचा आरोप !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-  सुपा ग्रामपंचायत हद्दीत मध्ये बोगस कागदपत्राच्या आधारे ९१ परदेशी व परप्रांतिय नागरिकांची नावे समाविष्ट करण्यात आलेली आहेत.

सदर मतदार हे मोकळ्या जागेत झोपडपट्टी बांधुन रहात असुन त्याचे दर सहा महिन्यांनी स्थलांतर होत असते. राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळे तीन बोगस आधार कार्ड व रेशन कार्ड मिळालेले असुन, त्या आधारावर सुपा-वाळवणे रस्त्यालगत कच्या स्वरूपाची पाल, तंबू असा निवारा करुन ते रहात आहेत.

या बाबत ग्रामविकास अधिकारी सुद्धा पहाणी करून अहवाल सादर केला आहे तसेच याबाबत सदर बोगस नावे असल्याचे निष्पन्न असल्याचा अहवाल पंचायत समिती सभापती यांना दिला होता, तरीसुद्धा ही नावे वगळण्यात आली नाहीत.

नविन मतदार नोंदणी करता 15 वर्ष रहिवासी पुरावा ग्राह्य धरला जातो तसा पुरावा ही सदर नाव नोंदणीत नाही हे माहीती अधिकारत सिध्द झाले.

तरी कुठल्या आधारावर ही नाव नोंदणी झाली, यासाठी अनेक राजकीय सामाजिक संघटनानी तहसीलदारांना निवेदने दिली तरीही ही नावे मतदान यादीतून वगळले नाहीत.

तहसीलदार स्थानिक आमदाराच्या दबावाखाली काम करत असुन, स्थानिक आमदार व सरपंच यांनी अधिक मतदान घडऊन आनण्याकरता या बांग्लादेशी नागरिकांचा वापर करतात.

तरी पारनेर तालुक्यातील सुपा ग्रामपंचायत हद्दीत ९१ बोगस नावे रद्द करावी, तसेच या गग्रामपंचायत निवडणुकी मध्ये या बोगस नावे असणाऱ्या लोकांना मतदानाचा अधिकार देऊ नये.

अशी कारवाई करवी अन्यथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी यांना मनअन्यथा महाराष्ट्र नवनिर्मानसेनेने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24