अहमदनगर Live24 टीम, 12 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर २ परिसरातील काजीबाबा रोड परिसरात राहणाऱ्या, युनूस युसूफ पठाण या ३३ वर्षीय युवकाने, बजाज फायनान्सच्या कार्यालयात अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्येचा प्रयत्न केलाय.
दुपारी वाजेच्या सुमारास, सदर युवकाचे २०१८ साली १ लाख रुपयांचे पर्सनल लोण घेतले होते, या लोणच्या फेडी पोटी, येणारे सर्व हप्ते सुरळीत भरून देखील,
युनूस पठाण याच्या खात्यातून, बजाज फायनान्स कंपनीने ३ ऑक्टोबर रोजा ३६०० रुपये व पुन्हा १२ ऑक्टोबर रोजी ४२३७ रुपये असे, एकाच महिन्यात २ वेळा हप्ते कसे वर्ग करून घेतले होते .
या संदर्भात तो बजाज फायनान्सच्या कार्यालयात ,विचारपूस करण्यास गेलेल्या युवकास तेथिल अधिकारी व कर्मचा-यांनी उडवा उत्तरे
दिल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या युवकाने संगमनेर रोडवर असलेल्या बजाज फायनान्सच्या कार्यालयातच अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला,
सुदैवाने त्याठिकाणी आलेल्या नागरिकांनी युवकाच्या हातातील काडीपेटी हिसकावून घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.