अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- गोवंश हत्या बंदीचा कायदा लागू केल्यानंतर गोरक्षकांनी आणि गोपालकांनी आनंद व्यक्त केला. अहमदनगर जिल्ह्यात जर गोवंश हत्येसाठी नेताना दिसत असेल तर गोरक्षक आणि गोपालक त्यास प्रतिबंध करताना दिसतात.
परंतु कोपरगाव शहरामध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. एक गायी पळवणारी टोळी येथे कार्यरत असून ही टोळी शहरातील गायींसह गुजरात येथून आलेल्या
गोरक्षकांच्या गायी पळवून त्या नजिकच्या बाजारात नेऊन खाटकांना विकत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ही टोळी एका हिंदुत्वादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती मिळत समोर आल्याने
खळबळ उडाली आहे. एका हिंदुत्वादी संघटनेशी संबंधित दुय्यम दर्जाच्या एका पदाधिकार्यांचा भाऊच यात गुंतला असल्याचे बोलले जात आहे.
नवीन औद्योगिक वसाहतीजवळ ही बाब उघड झाली असून एका छोट्या टेम्पोत हे काठियावाड गुराखी आपल्या गायी मुक्कामाच्या ठिकाणी घेऊन येत असताना
एक जखमी असलेली व त्यामुळे मागे राहिलेली गाय ही टोळी एक टेम्पो घेऊन पळविण्यासाठी आली. त्यांनी ती टेम्पोत घातली असता. ही खबर या गो नेत्यास लागली.
त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ही उतरून घेतली. त्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. गावातील बर्याच गायी गायब झाल्या असून या मागेही ही टोळी कार्यरत असल्याचे बोलले जाते.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved