अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :- सध्या देशभर कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कैक लाखांच्या घरात कोरोनाचे रुग्ण गेले आहेत. आज शासन सर्वाना घरत बसण्याची विनंती करत हे. संपर्ग टाळण्याचे आवाहन करत आहे.
परंतु या संकटात सर्वाना घरात सुरक्षित ठेवण्यासाठी काही कोरोनायोध्ये जीवाची बाजी लावत २४ तास आपले कर्तव्य बजावत आहेत. वैद्यकीय विभाग यातील एक. मागील चार महिन्यांपासून जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी जीवाची बाजी लावून काम करत आहेत.
परंतु त्यांच्यासोबतच अन्यय झाला आहे. लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी बाजी लावणाऱ्या या योध्यांचे तीन महिन्यांपासूनचे वेतन थकले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत वरिष्ठांकडे वेतनबाबत विचारणा केली असता, ते अंगावर धावून येत आहेत.
यामुळे मागे आड पुढे विहीर अशी परिस्थिती त्यांची झाली आहे अहमदनगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातंर्गत आरोग्य सेवक पुरूष लेखाशीर्ष 8508 चे वेतन नियमित मिळत नसल्याची तक्रार गेल्या काही महिन्यांपासून आहे.
यासंदर्भात गेल्या आठवड्यात कोपरगाव तालुक्यातील आरोग्य कर्मचार्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिलेले आहे. या निवेदनात जून महिन्यांपासूनचे नियमित वेतन प्रलंबित आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील काही आरोग्य कर्मचार्यांचे नियमित वेतन होत आहे.
आरोग्य सेवक पदावर काम करणार्या कर्मचार्यांच्या वेतनासाठी दोन वेगवेगळी लेखाशिर्ष आहेत. तीन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याने आरोग्य सेवकांचे अर्थकारण बदले आहे. सध्या लॉकडाऊनमुळे सर्वत्र मंदी असल्याने वेतन नसल्याने आरोग्य सेवकांची मोठी ओढाताण सुरू आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved