अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- जमिनीच्या वादातून तसेच या व्यवहारातून अनेकदा मारहाण, खून आदी घटना घडलेल्या आहेत. तसाच काहीसा प्रकार राहाता तालुक्यात घडला आहे.
तालुक्यातील तिसगाववाडी येथे जमिनीच्या वादातून एकास कुदळीने मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यासंदर्भात लोणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील लोहगाव हद्दीतील गट नं. 60 (हॉटेल ग्रीनपार्क समोर) या शेतजमिनीचा वाद न्यायप्रविष्ट आहे. आरोपी अमोल दिलीप नेहे, किशोर लहानू नेहे, वसंत लहानू नेहे, सुरेश लहानू नेहे, सचिन वसंत नेहे (सर्व रा. लोहगाव) हे 31 डिसेंबर रोजी सायंकाळी शेतात होते.
सदरच्या जमीनीच्या कडेला लोखंडी अॅगल रोवलेले होते व आरोपी सदरचे क्षेत्र नांगरत असल्याचे मयत गौरव कडू आणि त्याचा भाऊ किशोर यांनी चारा आणायला जाताना पाहिले.
हे पाहून मयत गौरव व त्याचा भाऊ किशोर तेथे गेले असता आरोपींसोबत शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर आरोपींनी मयतास व त्याच्या भावास मारहाण केली.
आरोपींकडून झालेल्या मारहाणीत गौरव गंभीर जखमी झाला. त्यास उपचारासाठी अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात नेले. दि. 2 जानेवारी रोजी उपचारादरम्यान गौरवचा मृत्यू झाला
व त्यानंतर सिव्हिल हॉस्पीटल येथे त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. 31 डिसेंबर रोजी झालेल्या मारहाणीसंदर्भात लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. मात्र आता गौरवच्या मृत्यूनंतर आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते