अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आता याचा शिरकावं ग्रामीण भागातही झाल्याने चिंता वाढली आहे.
सोमवारी दुपारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात २० कोरोना रुग्णांची नव्याने भर पडली होती. परंतु या रुग्णांमधील एका रुग्णाच्या माहितीबाबत प्रशासनातच विसंगती आढळून आली आहे.
सदर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शेवगाव तालुक्यातील रानेगाव येथील असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे तर शेवगावचे तहसीलदार रानेगावमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही असे सांगत आहेत.
त्यामुळे तालुका व जिल्हा प्रशासनाच्या माहितीत विसंगती निर्माण झाली आहे. याबाबतची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली होती.
मात्र नंतर रानेगाव येथून कोणाचेही स्राव तपासणीसाठी पाठवण्यात आले नव्हते, अशी माहिती तालुका आरोग्य विभाग व तहसीलदारांना मिळाली. कोणाचे स्वॅब घेतले नाही तरीही रानेगाव येथे रुग्ण कसा? याचा सवाल उपस्थित झाला.
तालुका आरोग्य विभागाने जिल्हा आरोग्य विभागाकडून माहिती घेतली असता त्या रुग्णाने रानेगावचा पत्ता दिल्याचे सांगण्यात आले.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी यांनीही फोनवरुन थेट त्या रुग्णाशी संपर्क साधला.
मात्र तो मुळचा बीडचा असल्याचे सांगत त्याने फोन कट केला. पुन्हा त्याला संपर्क केला असता त्याने फोनवर बोलणे टाळले. त्यामुळे या रुग्णाबाबत संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews