धक्कादायक! डोक्यात दगड घालून एकाची निर्घृण हत्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-   चुलात्यानेच पुतण्याच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा खळबळजनक प्रकार पारनेर तालुक्यातील वासुंदे येथे घडला आहे.

दरम्यान खून करून आरोपी पळून गेला मात्र त्यास ढवळपुरीत पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि,

राहुरी तालुक्यातील निंबेरे येथील सांगळे परिवारातील सदस्य पारनेर तालुक्यात वासुंदे परिसरात बांधकाममध्ये सेंटरिंगचे काम करत असत.

सोमवारी रात्री ८ वाजेच्या दरम्यान शांताराम निवृत्ती सांगळे हा आपला पुतण्या सोन्याबापू भीमराज सांगळे यास गावाकडे घेऊन निघाला असता रस्त्यात चुलत्याने सोन्याबापूसोबत वाद केला.

या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यात शांताराम याने सोन्याबापू याच्या डोक्यात दगड घातला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे.

सोन्याबापू चा भाऊ रामनाथ भीमराज सांगळे याने चुलता याच्या विरोधात फिर्याद दिल्याने चुलता शांताराम निवृत्ती सांगळे याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक घनश्याम बळप हे अधिक तपास करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24