अहमदनगर Live24 ,20 जून 2020 :पाथर्डी तालुक्यातील भिलवडे येथे धक्कादायक प्रकार घाला आहे. पोटचा मुलगाच जन्मदात्या वडिलांसाठी काळ ठरू पाहत आहे.
जमिनीची वाटणी मिळावी यासाठी मुलगा, सुन व सुनेचा भाऊ यांनी मिळून त्याच्या आई – वडीलांना चाकू व लाकडी दांडक्याने मारहाण केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार इंदूबाई व त्यांचे पती दादाबा बडे हे घरात बसले असताना त्यांचा मुलगा आरोपी अंबादास दादाबा बडे, सुनंदा अंबादास बडे व सुनेचा भाऊ बाळू बाबुराव घुले (रा. सर्व भिलवडे,ता. पाथर्डी)
यांनी जमिनीच्या कारणावरून शिवीगाळ केली. त्यांचा मुलगा अंबादास याने वडील दादाबा यांच्या गळ्याला चाकू लावून खिशातून स्टॅम्प काढला व स्टॅम्पवर अंगठे घेतले.
सूनंदा हिने सासु-सासर्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच आरोपी बाळू हा हातात लाकडी दांडके घेवून धमकावत होता. या तिघांनी तक्रारदाराच्या घरातील पेटीतील जमिनीचे खरेदीखत व कंबरेच्या पिशवीतील 900 रूपये काढून घेतले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews