अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील कासली फाट्या नजीक असलेल्या गॅस गोदामानजीकच्या एका घरात गॅसचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे.
या दुर्घटनेत तिघे जण गंभीर जखमी झाले आहे. त्यात महिला रंजना सोमनाथ कवडे रा. संवत्सर व महिलेचा पती सोमनाथ कवडे, एक लहान मुलगा असे तिघे गंभीर जखमी झाल्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कोपरगाव तालुक्यात संवत्सर शिवारात एच.पी. कंपनीची बाबासाहेब परजणे यांचे मालकीची गोपाल कृष्ण गॅस एजन्सी आहे.
या गॅस कंपनीचे गोडाऊन कासली रस्त्यालगत आहे. गॅस कंपनीचे राखण करण्यासाठी सोमनाथ कवडे या इसमाची नेमणूक कारण्यात आलेली आहे. दरम्यान सोमनाथ कवडे व त्यांची पत्नी रंजना कवडे हे काही कामासाठी बाहेर गेले असता कवडे यांच्या मुलाकडून स्वयंपाक घरातील गॅस चालू राहिल्याने गॅस संपूर्ण घरात पसरला.
काही वेळाने आई व वडील घरी आले असता रंजना यांनी गॅस सुरू करण्याचा प्रयत्न केला असता मोठा स्फोट झाला त्यात रंजना कवडे या 60 टक्के तर सोमनाथ कवडे हे 10 टक्के तर एक मूल काही प्रमाणात भाजला आहे. जखमींना ग्रामस्थांनी उपचारार्थ लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले आहे.