धक्कादायक ! मुलींच्या वसतिगृहात शिरला बिबट्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात बिबट्याची दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. यातच उत्तरेकडील भागांमध्ये अनेकदा बिबट्याचा वावर जास्त असल्याचे दिसून आले आहे.

बिबट्याने अनेक दिवसांपासून मानवी वस्तीवर हल्ले चढवत अनेकांचे प्राण घेतले आहे तर काहीना गंभीर जखमी केले आहे. यातच एक धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे.

संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथे बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सुनंदाताई गहीनाजी भागवत मुलींच्या वसतिगृह परिसरात हा बिबट्या बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान दिसून आला आहे.

नांदूर खंदरमाळ येथे सुनंदाताई गहीनाजी भागवत मुलींचे वसतिगृह आहे. बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास बिबट्याने या परिसरात प्रवेश केला.

अचानक बिबट्याला पाहून वसतिगृहातील मुली घाबरल्या. मुलींनी आरडाओरडा केल्याने परिसरातील ग्रामस्थांनी वसतिगृहाकडे धाव घेतली. आरडाओरडा झाल्याने बिबट्याने धूम ठोकली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24