अहमदनगर Live24 टीम, 10 ऑक्टोबर 2021 :- नगर जिल्ह्यातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झालेली दिसून येत आहे. यामुळे नागरिकांना देखील मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे.
तर अनेक घटनांमध्ये नागरिकांचे बळी देखील गेले आहे. तरी मात्र प्रशासनाला जाग आलेली नाही आहे.एकीकडे नागरिकांचे प्राण जात आहे, मात प्रशासन निर्धास्त असल्याने दिवसेंदिवस अपघातांचे सत्र वाढू लागले आहे. यातच बीड-जामखेड-नगर या राष्ट्रीय मार्गावरील २० किलोमीटरच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
या मार्गावर वर्षभरात ४०० अपघात होऊन १९ बळी गेले आहेत. आष्टी तालुक्यातील कडा येथुन गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. याची दखल घेत विभागाने ५१ किलोमीटर अंतरावर २५ कोटी रूपये खर्च करून हा रस्ता दुरुस्त केला.
मात्र एक वर्षांपासून साबलखेड, कडा, चिंचपूर हा वीस किलोमीटरचा रस्ता अद्याप पूर्ण झालेला नाही अथवा त्याची दुरुस्ती देखील करण्यात आलेली नाही. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. यामुळे वर्षभरात ४०० अपघातात १९ जणांचे बळी या खड्ड्यांनी घेतले.