अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-श्रीरामपूर शहारातील वार्ड नं. १ गोंधवणी रोड, नवीन घरकुल येथे राहणारी विवाहित तरुणी सौ. सविता काशीनाथ सपकाळ ही दुपारी साडेतीन वाजता घरी असताना आरोपी नवरा काशीनाथ पंडित सपकाळ याने पत्नीला लाथाबुक्क्याने मारुन वाईट शब्दात शिवीगाळ करत चारित्र्यावर संशय घेवून सिमेंट ब्लॉक डोक्यात मारून पत्नी सविता हिचे डोके फोडले.
जखमी सविता काशीनाथ सपकाळ या तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपी पती काशीनाथ पंडित सपकाळ याच्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोना ढोकणे हे पुढील तपास करीत आहेत.