धक्कादायक! गळफास घेत तरुणाने संपविले जीवन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- झाडाला गळफास घेत एका तरुणाने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान हि खळबळजनक घटना संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार परिसरात घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, रमेश नामदेव काळे (वय २६ रा. शेंडेवाडी पोस्ट हिवरगाव पठार ता. संगमनेर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

या तरुणाने कर्जुले परिसरात दूरवरच्या डोंगरावर जाऊन झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. या तरुणाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमागील कारण अजून माहित झाले नसून उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24