धक्कादायक! ‘ह्या’ कंपनीस कर्मचाऱ्यानेच लावला साडेतेरा लाखांचा गंडा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- कोपरगाव येथील गोकुळनगरी कॉम्प्लेक्समध्ये डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे यांची अश्वमेध अ‍ॅग्रोटेक लि. नावाची कंपनी आहे.

या कंपनीत नोकरीस असलेला विक्री प्रतिनिधी अजय प्रभाकर गंपावार (रा. बी.के.नगर, नागपूर) हा कंपनीची होंडा कार व लिनीओ कंपनीचा लॅपटॉप असा 13 लाख 24 हजार रुपये किंमतीच्या वस्तू घेऊन पसार झाला आहे.

तशी तक्रार अश्वमेध अ‍ॅग्रोटेकचे संचालक डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .

अधिक माहिती अशी: या कंपनीत निर्माण झालेला माल विक्रीसाठी अनेक विक्री प्रतिनिधी नेमलेले आहेत. ते कंपनीचा माल इतरत्र पोहोचवत असतात व त्याची रक्कम हिशेब करून आणून देत असतात.

त्यातील एक आरोपी प्रतिनिधी अजय गंपावार हा नागपूर येथील बी.के.नगर येथील राहिवाशी आहे. मार्च 2020 पासून त्याच्या ताब्यातील कंपनीच्या

13 लाख 24 हजार रुपये किंमतीच्या वस्तू त्यात एक लिनिओ कंपनीचा लॅपटॉप, एमएच- 17 – बी.एक्स.2177 होंडा कंपनीची कार, मोबाईल घेऊन पसार झाला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24